बालेवाडी पुणे येथे इंडियन आर्मी डे निमित्त मार्शल कॅडेट फोर्स, महाराष्ट्र यांच्यामार्फत 77 व्या इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेत अकुज चॅरिटेबल ट्रस्ट कुपवाड (सांगली) संचलित, अकुज इंग्लिश मिडीयम स्कूल, कुपवाड या शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. या इंटर स्कूल ड्रिल स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 71 शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये एकूण 300 गुणांची विभागणी होती त्यापैकी 272.34 गुण मिळवून अकुज इंग्लिश मिडीयम स्कूलने अव्वल स्थान पटकावून शाळेचे नावलौकिक वाढविले.
या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक प्रशांत आढळी सर, परशुराम नंदिवाले सर, अभय चौगुले सर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. आण्णासाहेब उपाध्ये सर, उपाध्यक्ष मा. श्री सुरज उपाध्ये सर, सचिव मा. रितेश शेठ सर, संस्थेच्या संचालिका व प्रशालेच्या प्राचार्या सौ.कांचन उपाध्ये यांची प्रेरणा लाभली. विद्यार्थी व प्रशिक्षक यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.