शक्तिपीठ महामार्गच रद्द झाला पाहीजे या मागणीसाठी अनेक दिवसांपासून सांगली जिल्ह्यातीलशेतकरी आंदोलन करीत आहेत. पण महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करायला तयार नाही. रेखांकन बदलुन महामार्ग करायच्या तयारीत सरकार आहे. पण ज्या भागातुन हा महामार्ग जाणार आहे, तेथील शेतकऱ्यांना मोबदला कसा देणार याबाबत सरकार किंवा मुख्यमंत्री बोलायला तयार नाहीत.
काल महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने पर्यावरण खात्याकडे शक्तिपीठ महामार्गाबाबत परवानगीसाठी अर्ज दाखल केला. आणी आज मा. मुख्यमंत्री यांनी सह्याद्री अतिथीग्रहात बैठक घेवुन शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. मा. हासन मुश्रीफ यांनी महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातुन न जाता तो संकेश्वरच्या बाजुने नेहणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातुन झाल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे शक्तिपीठ महामार्ग होणार आहे. फक्त कोणत्या शेतकऱ्यांच्या घरावरुन नांगर फिरवायचा हे जाहीर व्हायचे राहीले आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजुने ठाम उभा राहुन शक्तिपीठ महामार्गाला टोकाने विरोध करु असा ईशारा देत आहोत.
आपले,
उमेश देशमुख, सतिश साखळकर, प्रभाकर तोडकर, सुनिल पवार, उमेश एडके,प्रवीण पाटील, यशवंत हारुगडे