आज मकर संक्रांतीच्या पवित्र दिनी, मुंबईतील मंत्रालयात महायुती सरकारमधील मंत्रीमहोदयांची भेट घेतली आणि सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. ‘तिळगुळ घ्या, गोड बोला’ या संदेशासह, पक्षभेद बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या प्रगतीसाठी एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पर्यटन व खनिकर्म मंत्री शंभुराजे देसाई, ओबीसी व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, मा. संजय बनसोडे यांच्याशी संवाद साधत सांगली लोकसभा मतदारसंघातील प्रमुख विकास विषयांवर चर्चा केली.
या चर्चेत सांगलीच्या प्रमुख समस्यांची सोडवणूक आणि भविष्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पांसाठी राज्य सरकारची सहकार्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या मदतीने सांगलीमध्ये विविध प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकारच्या सहाय्याची गरज आहे, त्या दिशेने सर्व मंत्रीमहोदयांनी माझ्या दृष्टीकोनाला पाठिंबा दर्शवला आहे.
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी पक्षभेद सोडून सर्वच मंत्रीमहोदयांनी पूर्णपणे सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सांगलीच्या प्रगतीसाठी त्यांचा पाठिंबा व सहकार्य प्राप्त होईल, याची मला खात्री आहे. यावेळी सर्व मान्यवरांनी कार्यशैलीचे, संसदेतील भाषणांचे कौतुक केले याचा आनंद आहे.