सांगली: महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०२४-२५ हि स्पर्धा २९ जानेवारी २०२५ ते २ फेब्रुवारी २०२५ कालावधीत अहिल्यानगर या ठिकाणी पार पडणार आहे. सदर स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचा संघ निवडण्यात येणार असून सदर निवड चाचणी स्पर्धा सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या मान्यतेने व लोकविकास प्रतिष्ठान पळशी , पै. सत्यजित (भैया) पाटील व मंतन (नाना) मिटकरी मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानानेआयोजित केली आहे.
सदर स्पर्धा शनिवार दिनांक १८ जानेवारी २०२५ ते रविवार दिनांक १९ जानेवारी २०२५ रोजी साळशिंगे रोड, व्हिजन सिटी समोर, संस्कार लॉन, विटा ता. खानापूर जि. सांगली या ठिकाणी आयोजित केली आहे.
तरी सर्व खेळाडूंनी १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ठीक ८ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी वजनासाठी उपस्थित राहावे व स्पर्धा दुपारी ३ वाजता सुरु होतील याची नोंद सर्व पैलवान, वस्ताद, पालक मंडळींनी घ्यावी असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष पै राहुलदादा पवार यांनी केले आहे .
सदर मिटिंगसाठी पै. राहूलदादा पवार, पै. सचिन पाटील, पै. सुनील चंदनशिवे, पै. सदाशिव मलगान, पै. नामदेव बडरे, पै. नितीन शिंदे, पै. सुनील परमने, पै. प्रताप एडके, पै. युवराज पाटील, पै. दत्तात्रय धोकटे, पै. सतीश जाधव, पै. उदय खंबाळे व पै. अविनाश सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.