श्रीमती सोनाबाई अण्णासो पाटील कन्याशाळेची शुटिंग बॉल स्पर्धेत सलग ३ वर्ष विजयाची हॅट्रीक, राज्यात सर्वप्रथम...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/01/2025 12:02 PM

 दि.12,13,14 जानेवारी 2025 यवतमाळ येथे झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय राज्य स्तर शूटिंग बॉल स्पर्धा वयोगट 17 वर्ष..श्रीमती सोनाबाई आण्णासो पाटील कन्या शालेच्या मुलींच्या संघाने विजय संपादन केला.अंतिम सामना पुणे बरोबर झाला. पुणे संघाचा पराभव करून सुवर्ण पदक  मिळविला. संघात सर्व मुली इयत्ता 10वी मधील होत्या.10 वी बोर्डकडून 15 मार्क्स मिळणार आहेत. यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड साहेबांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.


अभिनंदन! अभिनंदन !अभिनंदन!
आपल्या श्रीमती सोनाबाई आण्‍णासो पाटील कन्या शाळा कुपवाड मधील विद्यार्थिनी
कु.तेजस्वी विठ्ठल करे 
इयत्ता- 10 वी 
या विद्यार्थिनीची ओडिसा (जगन्नाथ पुरी) येथे होणाऱ्या महिला राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे
माननीय मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून तिचे हार्दिक हार्दिक अभिनंदन....

Share

Other News

ताज्या बातम्या