नांदेड : एकोणवीस वर्ष मुले मुली गटातील राष्ट्रीय शालेय बेसबॉल क्रीडा स्पर्धेचे बुधवारी सकाळी नांदेड येथील पिपल्स कॉलेजमध्ये शानदार उद्घाटन झाले. देशातील अनेक राज्यांच्या चमू या ठिकाणी सहभागी झाल्या असून क्रीडा प्रेमींनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बेसबॉल (19 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि.14 ते 18 जानेवारी, 2025 या कालावधीत पिपल्स कॉलेज, नांदेड येथे करण्यात आले आहे.
ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि.15 जानेवारी या राज्य क्रीडा दिनाचे औचीत्य साधून या राष्ट्रीय स्पर्धेचे उदघाटन 15 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वा. उदघाटन जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांचे शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका,नांदेड डॉ.महेशकुमार डोईफोडे, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, लातूर विभाग,लातूर जगन्नाथ लकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी तथा स्पर्धा निरीक्षक जयकुमार टेंभरे, राजेंद्र इखनकर सचिव, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन,रावसाहेब जाधव प्राचार्य, पिपल्स कॉलेज, नांदेड, लक्ष्मण शिंदे, (प्राचार्य, सांयन्स कॉलेज, नांदेड), इंद्रजीत नितरवार, संजय कुमार (सदस्य, एस.जी.एफ.आय.) आदी मान्यवर उपस्थीत होते.
सर्व राज्याच्या संघानी त्यांच्या राज्याच्या झेंडा फडकवत संचलन केले. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते एस.जी.एफ.आय. व महाराष्ट्र राज्याच्या झेंडा फडकवून व दिपप्रज्वजलन करुन स्पर्धेस सुरुवात करण्यात आली. तसेच महात्मा फुले शाळेच्या लेझीम पथकानी त्यांच्या कलेतून विविध राज्यातून आलेल्या संघाची मने जिंकली.
कार्यक्रमाच्या प्रस्तावीक जयकुमार टेंभरे यांनी केले. कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी अबिनाश कुमार यांनी म्हणाले की, शालेय क्रीडा स्पर्धेतून खेळाडूंचा शारीरिक, बौध्दीक व संघटनात्मक विकास होतो. खेळातून शारीरिक लवचिकता दिसून येते. शालेय जिवनातून विद्यार्थ्यानी एक तरी खेळ खेळावा व आपले करीअर घडवावे असे सांगीतले व या स्पर्धेकरीता देशातील विविध राज्यातुन आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
डॉ.महेशकुमार डोईफोडे (आयुक्त) यांनी प्रथम नागरीक म्हणून नांदेड नगरी आलेल्या राष्ट्रीयस्तर स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडू, व्यवस्थापक, क्रीडा मार्गदर्शक यांचे स्वागत करुन राज्य क्रीडा दिनाच्या सर्व खेळाडूंना व राष्ट्रीय स्पर्धामध्ये उत्कृष्ट खेळ दाखविण्याच्या शुभेच्छा दिल्या.
जगन्नाथ लकडे (उपसंचालक, लातूर) यांनी सर्व खेळाडूंना खेळ भावनेने व उत्कृष्ट प्रदर्शन करुन आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवावी, असे शुभेच्छा व आवाहन केले. राज्य क्रीडा दिनानिमीत्य सर्व खेळाडूंना दिवंगत ऑलिम्पिकवीर श्री.खाशाबा जाधव यांच्या स्मृतीला उजाळा दिला व खेळाडूंना श्री.खाशाबा जाधव सारखे पदक प्राप्त करुन राज्य व राष्ट्राचे नांव मोठे करण्याकरीता शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेकरीता तांत्रीक समिती सदस्य इंद्रजित नितनवार (अमरावती), शंकर शहाणे (परभणी), संतोष खेंडे (सोलापूर) आदींची तर महाराष्ट्र राज्याच्या संघाचे क्रीडा मार्गदर्शक म्हणून ज्ञानेश काळे व आनंदा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज झालेल्या सकाळ सत्रातील सामन्यांचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे.
19 वर्षे मुले- 1) छत्तीसगड – चंदीगड (3-2 गुण), 2) महाराष्ट्र-आंध्रप्रदेश (16- 2 गुण), 3) मध्यप्रदेश–गुजरात (1-11 गुण) तर 19 वर्षे मुली- 1) केरला- आसाम (11-1 गुण), 2) विद्याभारती- मध्यप्रदेश (10-10 गुण- टाय)
सदर स्पर्धा यशस्वी करणेसाठी मा.जयकुमर टेंभरे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी श्री. संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री.बालाजी शिरसीकर, श्रीमती शिवकांता देशमुख, (क्रीडा अधिकारी) श्री. राहुल श्रीरामवार, श्री. विपुल दापके, वरिष्ठ लिपीक श्री.संतोष कनकावार, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, कपील सोनकांबळे, वैभव दोमकोंडवार, ज्ञानेश्वर सोनसळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, कृष्णा परिवाले, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व बेसबॉल असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडू आदि सहकार्य करीत आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन विष्णु शिंदे व सुभाष धोंगडे यांनी केले.
सदर राष्ट्रीय स्पर्धा पिपल्स कॉलेज व सायंन्स कॉलेज, नांदेड येथील मैदानावर आयोजीत करण्यात आले असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त खेळाडूं, क्रीडाप्रेमी, रसीक यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.