जयहिंद सेना पक्षाच्या नेते पदी डॉ. मन्नान शेख यांची नियुक्ती कार्यकारिणी सदस्य रामभाऊ पाटील, कुपवाड शहर प्रमुख पदी वसंत तोडकर यांच्या निवडी जाहीर.
सांगली : गुंठेवारी भागातील नागरिकांच्या प्रश्नांसाठी राज्यात स्थापन झालेली जय हिंद सेना आता नागरिकांच्या सर्व प्रश्नांवर काम करणार आहे. त्या दृष्टीने राज्यभर संस्थेचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंदन चव्हाण यांनी दिली. तर नव्याने पक्षाच्या नेते पदी डॉ. मन्नान शेख यांची तर कार्यकारणी सदस्य रामभाऊ पाटील व आदर्श नलवडे यांच्या निवडी चंदन चव्हाण यांनी जाहीर केल्या.
चंदन चव्हाण म्हणाले, महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी भागातील नागरिकांच्या अनेक समस्या होत्या. या समस्या सोडविण्यासाठी गुंठेवारी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. भविष्यात ही संघटना राज्यभर विस्तारीत झाली. आता राज्यात नव्याने जयहिंद सेनेची स्थापना करण्यात आली आहे. गुंठेवारी भागातील प्रश्नांबरोबर आता नागरिकांच्या सर्व प्रश्नांसाठी ही संघटना काम करणार आहे. पक्ष मान्यतेसाठी जिल्हाधिकार्यांनी देखील मान्यता दिली आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांच्या प्रश्नांवर आंदोलने करून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संघटनेच्या नव्याने पदाधिकार्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये सेनेच्या प्रदेश कार्यकारणीवर मन्नान शेख व कार्यकारणी सदस्यपदी रामभाऊ पाटील, आदर्श नलवडे यांची तर कुपवाड शहर प्रमुख पदी वसंत तोडकर,नईम शेख यांची गुंठेवारी सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यांचा सत्कार चंदन चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. मन्नान शेख म्हणाले, चळवळीच्या माध्यमातून राज्यभर काम करू. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांना घेऊन काम करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी जयहिंद गुंठेवारी सेनानेते रामदास सावंत, जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी , युवराज माने, शिवाजीराव वाघमारे, प्रतीक पाटील, ऋषिकेश जगताप, राजवर्धन सावंत, अक्षय पवार आदी उपस्थित होते.