वाढीव घरपट्टी व इतर ज्वलंत नागरी प्रश्नांबाबत आमदार गाडगीळांनी मनपास जाब विचारावा : मनोज भिसे, अध्यक्ष लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 09/01/2025 11:30 AM

* *सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने अवाजवीकर वाढ करून लोकांच्यावर मोठा भुर्दंड लागला आहे. हा भुर्दंड अन्यायकारक असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेकडे येत आहेत त्याबाबत अनेक पक्ष आणि संघटनांनी या विरोधात आवाज उठवत घरपट्टी विरोधात आक्षेप घेतला आहे.*                                          *सांगलीतील लोकहित मंच च्या वतीनेही ही करवाड अन्यायकारक असल्याचे म्हणत आमदार खासदारांसह महानगरपालिका प्रशासनाला निवेदन देत याबाबत साकडे घातले गेले आहे. शिवाय या करवाडी  विरोधात नागरिकांनी 3000 पेक्षा जास्त हरकती नोंद केल्या असून ज्या सुविधा महानगरपालिका पुरवत नाही त्या सुविधांचाही कर आकारण्यात आल्याच्या तक्रारी होत आहेत. मोकाट कुत्री रस्त्यांच्या दुरावस्था रस्त्यांना पडणारी भगदाडे, गटारांची समस्या अंडरग्राउंड ड्रेनेजची समस्या यासह इतर समस्या असतानाही महानगरपालिका प्रशासनाकडून ही जबरदस्तीने कर आकारणी  अन्यथा लोकहित मंच तीव्र आंदोलन उभा करेल असा इशारा आम्ही देत आहोत*                                                   *सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी याबाबत 15 जानेवारी रोजी महानगरपालिका प्रशासनाशी आढावा बैठक घेण्याचे जाहीर केले असून, त्यांचा हा निर्णय कौतुकास्पद म्हणावा लागेल. आमदार सुधीर गाडगीळ यांनी ज्या मतदारांनी निवडून दिले त्या मतदारांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देऊन त्यांच्या बाजूने उभे राहणे गरजेचे आहे. याबाबत लोकहित मंचच्या वतीने  वतीने ही आमदार सुधीर गाडगीळ यांच्याशी पत्रव्यवहार करून याबाबत पाठपुरावा केला आहे.*              *महानगरपालिका क्षेत्रात अचानक पडलेले खड्डे आजही कित्येक महिन्यांपासून आहे त्याच अवस्थेत असून त्याच्या आमदारांनी महापालिका प्रशासनास जाब विचारावा अशी मागणी आम्ही लोकहित मंचच्या वतीने  करण्यात येत आहे*.


* *मनोज भिसे अध्यक्ष लोकहित मंच सांगली*

Share

Other News

ताज्या बातम्या