विकासात्मक कामांना गती द्या - खासदार प्रतिभा धानोरकर
यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली आढावा बैठक.
चंद्रपूर लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या वणी, आर्णी विधानसभेतील नागरीकांच्या तसेच विकासात्मक कामांच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत कापुस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच नागपूर-बोरी-तुळजापूर महामार्गासाठी भुसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला देण्याच्या संदर्भाने बैठकीत चर्चा झाली. या सोबतच खनिज विकास निधी अंतर्गत कामांना गती देण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी सध्या जगात थैमान घालण्याऱ्या एचएमपीव्ही विषानुच्या प्रादुर्भाव वाढू नये याकरीता आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्याचे आदेश खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. यावेळी, सर्व विभागातील अधिकाऱ्यांना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभा क्षेत्रात सुरु असलेल्या विकास कामांना गती देऊन तात्काळ पुर्ण करण्याच्या सुचना देखील केल्या.
यावेळी, बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकरी मंदार पतकी, पोलिस अधिक्षक कुमार चिंता, निवासी जिल्हाधिकारी श्री. उंबरकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. जोशी, उप विभागीय अभियंता श्री. धांडे, वैशाली रसल, कॉग्रेस नेते जितू मोघे, आरिश बेग, अमर पाटिल, संदीप बुर्रेवार, निखिल देठे, सुनिल भारती, रुपेश कल्याणवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.