माझ्या सामाजिक कार्याच्या प्रवासाला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत, आणि दशकाकडे वाटचाल करताना मनात समाधान आणि नवीन ऊर्जा आहे. गेल्या नऊ वर्षांत शिक्षण, आरोग्य, आणि स्वच्छता यांसारख्या क्षेत्रांत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला. स्वच्छता अभियानाला विशेष प्राधान्य देत, समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी झटत आलो.
आपला भारत देश तरुणांचा आहे, आणि जर तरुणांनी समाजासाठी आणि देशासाठी वेळ दिला, तर भारत अधिक बलशाली होईल, यावर माझा ठाम विश्वास आहे.
या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार, आणि पुढील दशकासाठी नवीन प्रेरणा घेऊन काम करण्याचा संकल्प...!
*राकेश दड्डणावर*
*एक युवा भारतीय*