स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही : चंद्रपुर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांकडून मोटारसायकीलसह १३.८३५ कि.ग्रॅम गांजा जप्त

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 03/01/2025 11:26 AM

चंद्रपुर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमांकडून मोटारसायकीलसह १३.८३५ कि.ग्रॅम गांजा जप्त 

स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

चंद्रपुर जिल्ह्यामध्ये मा. श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, मा. रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्स, गांजा अशा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालु आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक मा. श्री. मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्याप्रमाणात अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कारवाई सुरू आहे.

 दिनांक ०२/०१/२०२५ रोजी १०.०० वा. चे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे देवराम केसगिर, रा. खडकी, ता. जिवती, जि. चंद्रपुर हा इसम गांजा या अंमली पदार्थ घेवून विक्रीकरीता मोटारसायकीलने राजुरा येथे येणार आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना होवून पोस्टे राजुरा हद्दीतील मौजा भेंडवी फाटा येथे दबा धरून बसून राहून मिळालेल्या माहितीमधील इसम येताच त्याचेवर मोठ्या शिताफीने छापा टाकून त्यास मोटारसायकीलसह ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ असलेल्या पोत्यामध्ये एकुण १३.८३५ किग्रॅम गांजा किंमत १,९५,०००/- रूपये, तसेच हिरो कंपनीची मोटारसायकील किंमत ५०,०००/- असा एकुण २,४५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर इसमांचे विरूद्ध कलम ८ (क), २१ (ब) ii (ब), २९ एन.डी.पी.एस. प्रमाणे पोलीस स्टेशन राजुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना पुढिल तपासकामी पोलीस स्टेशन राजुरा यांचे ताब्यात देण्यात आले.

आरोपींचे नाव :- 1) देवराव माणिकराव केसगिर, वय 50 वर्ष, रा. पल्लेझरी, ह.मु. रा. शेनगांव ता. जिवती जि. चंद्रपुर, 2) दिनकर शंभु कुळसंगे, वय 50 वर्ष, धंदा मजुरी, रा. खडकी, ता. जिवती, जि. चंद्रपुर

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, शिवाजी कदम, पोलीस निरीक्षक, पोस्टे गडचांदुर यांचे नेतृत्वात सपोनि. दिपक काँक्रेडवार, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. मधुकर सामलवार, पोहवा. किशोर वैरागडे, दिपक डोंगरे, नापोअं. संतोष येलपुलवार, पोशि. गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे, चापोहवा. दिनेश आराडे स्थागुशा चंद्रपुर यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या