मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लगार समिती(ZRUCC) सदस्यपदी किशोर भोरावत यांची निवड

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/12/2024 4:52 PM

         रेल्वे प्रवासी संस्था मिरज जंक्शन चे जिल्हाअध्यक्ष व मा.मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांची मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती (ZRUCC) सदस्यपदी निवड करण्यात आली.
           सदर निवड हि दोन वर्ष कालावधीची असेल
       सांगली जिल्ह्यांचे मा.पालकमंत्री तथा कामगार मंत्री मा.आमदार डाँ.सुरेशभाऊ खाडे यांच्या शिफारशीनुसार केंद्रीय रेल्वेमंत्री मा.आश्वीन वैश्णव यांच्याकडुन हि निवड करण्यात आली.
             रेल्वे प्रवास व स्थानकांतील समस्या,सह्याद्री एक्सप्रेस मुंबई प्रयंत सुरु करणे कोल्हापुर मुंबई वंदेभारत,सकाळी मिरज कलबुर्गी एक्सप्रेस व लातुर मिरज इंटरसिटी सुरु करणे,मिरज जंक्शन चे रखडलेले पिटलाईन चे काम व मिरज जंक्शनचे माँडेल स्टेशनचे काम सुरु करण्यासाठी पाठपुरवठा करणार असल्याचे मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रिय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत व रेल्वे प्रवासी संस्थाचे कार्याध्यक्ष संदिप शिंदे उपाध्यक्ष राजेंद्र पाटिल, श्रीकांत माने, पंडितराव कराडे (तात्या), वाय सी कुलकर्णी,मधुकर साळुंखे,व पाडुंरंग लोहार यांनी सांगीतले.

Share

Other News

ताज्या बातम्या