रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया( आंबेडकर गट) च्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्या निषेधार्थ निर्देशने...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/12/2024 8:54 AM

 भारतीय संविधानाचे शिल्पकार, नव्या भारताच्या जडणघडणीत ज्यांचे मोठे योगदान आहे असे करोडो भारतीयांचे मुक्तिदाते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भारतीय संसदेत, "देशाचे गृहमंत्री अमित शहा" यांनी प्रचंड द्वेषाने खदखदलेले अवमानकारक विधान केल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) च्या वतीने पक्षाच्या म. आ. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपाताई वायदंडे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करत "जाहिर निषेध आंदोलन" करुन शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. अमित शहा यांच्या बाबतच्या आंबेडकरी जनतेच्या व रिपब्लीकन पक्षाच्या तीव्र भावना देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी, मा. ना. राज्यपालसॊ, महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्रीसो यांना कळविण्याची मागणी केली. जिल्हाप्रशासनाने तातडीने सदर निवेदन राज्यकर्त्यांकडे पोहचविण्याचे शिष्टमंडळास आश्वासित केले.
    आंदोलनास प्रताप बाबर, अमर तांदळे, शबाना नदाफ, राणी गायकवाड, समाधान सोनवणे, रमेश तिळवे, शैलेश सोनुले, पुष्पा नलवडे, गीता सुतार, माधुरी कोरे, प्रिया कांबळे, गीता कांबळे, रंजना कांबळे, साधना परीट, रोहिणी पाटील, महिपती खिलारी, अविनाश कांबळे, सुरेश खिलारी,उत्तम सुतार, पूजा भोसले, जनाबाई कांबळे, संगीता चांदणे, मंगल भाले, मोहन चांदणे, शाहीर, केशव कांबळे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या