सरपंच प्रतिष्ठान २०२५ चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 26/12/2024 2:25 PM

  सरपंच प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेचा 2025 चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा शेड्याळ (ता जत)येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील सर्व विद्यार्थी व गावातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला...
सरपंच प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य या सेवाभावी संस्थेच्या वतीने प्रकाशित केला जाणारा 2025 चा दिनदर्शिका कॅलेंडरचा आज प्रकाशन करण्यात आला..
या संस्थेच्या वतीने संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण. अनाथ आश्रम मध्ये फळे वाटप करण्यात येतात.यासामाजिक संस्थेच्या वतीने कोरोना काळामध्ये सांगली शहर सिव्हिल हॉस्पिटल. एसटी स्टँड. परिसरात बेघर व्यक्तींना 5 दिवस प्रत्येक दिवशी 50 व्यक्तींना मोफत जेवण घेण्याचा उपक्रम या संस्थेच्या वतीने केलेला होता..
सामाजिक व धार्मिक सांस्कृतिक कार्यामध्ये या संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे..
या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सरपंच सेवा संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांचं सामाजिक चळवळीमध्ये कार्य नेहमी उल्लेखनीय आहे. म्हणून 2024 नंतर यावर्षीचा 2025 चा दिनदर्शिका कॅलेंडर वितरण करण्याचा निर्णय घेतला.हि दिनदर्शिका सर्वांना उपयोगी पडावा व गावात ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात जे काही विकास कामे झाली याची माहिती ही सर्वांच्या पर्यंत पोहोचावी या हेतूने हे दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले ..
सरपंच प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या दिनदर्शिका वितरण प्रसंगी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवानदास केंगार.सरपंच कर्यापा गुगवाड.शालेय शिक्षण व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्याधर जाधव.माजी सरपंच अशोक जाधव.माजी उपसरपंच भाऊसो जाधव.माजी अध्यक्ष पारसे गुरुजी.सांगली पोलीस.पुंडलिक केंगार.नितीन नरुटे.प्रवीण जावीर.अशोक तेली.या शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब पांढरे.मनोहर जाधव. विजय लिंगाडे. गोपाळ बिराजदार. सुभाष मासाळ.उत्तम बंडगर.नागणे सर.यांच्यासह शाळेतील सर्व स्टाफ व विद्यार्थी विद्यार्थिनी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Share

Other News

ताज्या बातम्या