गुरु रविदास सार्वजनिक जयंती मंडळाच्या अध्यक्ष पदी विठ्ठल वाघमारे यांची निवड

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 25/12/2024 7:59 PM

नांदेड :-  गुरु रविदास जयंती निमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा नांदेड च्या वतीने चर्मकार समाजाची बैठक राधाई अर्बन निधी तरोडा नाका नांदेड येथे घेण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड हे होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात गुरु रविदास जयंती साजरी करण्यासाठी समिती नेमण्यात आली यावेळी सर्वानुमते राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल वाघमारे यांची गुरु रविदास सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी माधवराव निंबाळकर, संदीप गोरे, सुनील माहुरे, के.के. गंगासागरे, माधव सूर्यवंशी, लक्ष्मण वाघमारे, कोषाध्यक्ष पदी विशाल बनसोडे, कार्याध्यक्ष पदी गजानन जोगदंड, सुरेश शेळके, सह कोषाध्यक्ष पदी नरसिंह सूर्यवंशी, प्रसिद्धीप्रमुख रविराज गंगासागरे, भारत अन्नपूर्णे, यांची निवड करण्यात आली, या बैठकीत राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संजय सोनटक्के, दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे, बंडू गायकवाड, सचिन दुधंबे, एकनाथ सूर्यवंशी, आनंदा वाघमारे, यांच्यासह कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या