*गोपाळराव वानखेडे विद्यालय नांदगाव (पोडे) येथे अपूर्व विज्ञान मेळावाचे आयोजन* *मा.धनंजय साळवे-गट विकास अधिकारी (BDO)यांचे हस्ते झाले उदघाटन*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 25/12/2024 7:22 PM

◼️गोपाळराव वानखेडे विद्यालय नांदगाव (पोडे) येथे अपूर्व विज्ञान मेळावाचे आयोजन

◼️मा.धनंजय साळवे-गट विकास अधिकारी (BDO)यांचे हस्ते झाले उदघाटन

 चंद्रपूर: स्व. गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव पोडे येथे दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी  अपूर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले,मेळाव्याचे उदघाटन मा.  धनंजय साळवे गट विकास अधिकारी प स बल्लारपूर यांचे शुभहस्ते करण्यात आले,कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे, विशेष अतिथी  नागेंद्र कुमरे केंद्रप्रमुख विसापूर , मल्लेश कोडारी उपसरपंच नांदगाव ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे रवी पोचमपल्लीवार ,विज्ञान मेळाव्याचे परीक्षक श्री वरघने सर, मुख्याध्यापक जि प हाय विसापूर,श्री संजय घाटे सेवानिवृत्त विज्ञान शिक्षक  यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन तथा दिप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उद्घाटनिय भाषणातून धनंजय साळवे  यांनी महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसन चे उदाहरण देऊन  तर्क व चिकित्सक बुद्धीतून कल्पना शक्ती वाढते आणि त्या साठी अश्या विज्ञान मेळाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला  पाहिजे असे मौलिक मार्गदर्शन केले.प्रमुख अतिथी नागेंद्र कुमरे यांनी  कौशल्य आणि तंत्रज्ञान ऊर्जा देतात आणि  जन्मापासून आपण विज्ञान शिकतो तसेच अनुभवातून सर्वांगीण विकास होतो याविषयी  मौलिक मार्गदर्शन केले .
परीक्षक म्हणून लाभलेले वरघने सर यांनी अवगत केलेल्या ज्ञानाचे सादरीकरण शास्त्रीय भाषेत मांडणी करणे म्हणेच विज्ञान होय असे मार्गदर्शन केले .
शाळेचे राज्यपुरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून  अपूर्व विज्ञान मेळावा म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संकल्पना रुजविणारा एक हसत खेळत विज्ञानाशी मैत्री करणारा मेळावा आहे , विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव असे नवनवीन उपक्रम शाळेत घेणे काळाची गरज आहे असे मनोगतातून व्यक्त करून मेळाव्यात सहभागी झालेल्या  विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या .मेळाव्यात वर्ग 8 ते 12 वीच्या 66 विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून विज्ञान प्रतिकृतीचे सादरीकरण केले,त्या प्रतिकृतीचे परीक्षण श्री वरघणे सर व घाटे सर यांनी केले,विज्ञान मेळाव्याला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  विज्ञान शिक्षिका सारिका कुचनकर यांनी तर आभार  प्रा .दिपक तूरानकर यांनी मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या