नांदेड : साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळ शिरूर अनंतपाळ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक , समीक्षक, कवी देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे . फुलारी यांना आज साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने अध्यक्ष पदाचे निमंत्रण पत्र देण्यात आले आहे.
मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या अनेक साहित्यकृती देविदास फुलारी यांनी दिले आहेत. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून, समष्टीच्या कल्याणाचा विचार पेरणाऱ्या देविदास फुलारी यांनी साहित्य चळवळीला दिलेले योगदान अतुलनीय असेच राहिले आहे. त्यांच्या या साहित्य सेवेमुळे महाराष्ट्रातील अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2025 रोजी मोरया लॉन्स शिरूर आनंदपाळ येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय मराठी एकदिवसीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी देविदास फुलारी यांची निवड करण्यात आली आहे . या निवडीचे पत्र साहित्य आणि संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष बालाजी येरोळे यांच्यासह शिवाजी मादलापुरे , प्रभाकर कुलकर्णी , किरण कोरे , मार्तंड कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कथाकार दिगंबर कदम, प्रा. महेश मोरे , राम तरटे आदींची उपस्थिती होती.