. नव महाराष्ट्र शिक्षण संस्था,व अकूज चॅरिटेबल ट्रस्ट, कुपवाड.संयुक्त सर्व विभागांच्या शाळांची आंतर- शालेय स्पर्धेचा समारोप उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलन व प्रमुख उपस्थित मान्यवर कॅप्टन भालचंद्र पाटील यांचा हस्ते संस्था ध्वजारोहणाने झाली. संचलन व मानवंदना MCF प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी केले. अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्पोर्ट्स गीत गायले.
प्रास्ताविक व प्रमुख पाहूण्यांचा परिचय संस्थेचे अध्यक्ष मा. आण्णासाहेब उपाध्ये सर यांनी केले. व थोडक्यात संस्थेच्या कार्याची माहिती दिली. शाळेला नव्याने खरेदी करण्यात आलेल्या स्कूल बसचे पुजन करण्यात आले.
मैदान पुजन करून रस्सीखेच फाईनल सामन्याची सुरूवात करण्यात आली. बक्षीस वितरण मा. कॅप्टन भालचंद्र पाटील, मा. प्रकाशभाई शहा, श्री. अमोल पाटील, श्री. आण्णासाहेब उपाध्ये सर, सुरज उपाध्ये सर, व सचिव रितेश शेठ सर यांचे हस्ते करणेत आले. आंतरशालेय स्पर्धेचे प्रमुख विजयी संघ अकुज् इंग्लिश मिडीयम स्कूल प्री प्रायमरी विभाग, इ. 1 ली ते 4 थी मध्ये न्यू प्रायमरी स्कूल व इ. 5 वी ते 10 वी गटात सौ. आ. आ. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड यांना फाईनल ट्रॉफी प्रदान करणेत आली.
प्रमुख पाहुण्यानी आपल्या भाषणामध्ये मुलांना खेळा विषयी मार्गदर्शन केले. व सध्याच्या युगात खेळ आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे याबाबत माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब उपाध्ये, उपाध्यक्ष सुरज उपाध्ये, सचिव रितेश शेठ,संचालिका आशालता उपाध्ये, कांचन उपाध्ये ,सर्व विभागांचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सर्व विभाग मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी तर सुत्रसंचालन कुदंन जमदाडे यांनी तर आभार अनिल चौगुले यांनी मानले.