दहिवडीत विद्रोही सामाजिक संघटनेचा निषेध मोर्चा
आरटी आय न्यूज नेटवर्क
(गोंदवले प्रतिनिधी)
परभणीत झालेला संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी राज्यसभेत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या अपमानाच्या निषेधार्थ दहिवडी ता.माण विद्रोही समाज संघटनेच्यावतीने दहिवडीतील तहसीलदार कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या संख्येने महिलांसह बहुजन
बांधव सहभागी झाले होते. यामध्ये तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परभणीत संविधान प्रतिकृतीच्या अपमानित घटनेनंतर शांततेत
दहिवडी येथे विविध घटनांचा निषेध काढलेल्या निषेध मोर्चातील तरुणांवर वेगवेगळी कलमे लावून खोटवा केसेस दाखल केल्या आहेत. या घटनेत पोलिसांनी बाड़ा शक्तींना हाताशी चरून जिल्हाधिकाऱ्यांच्या
परभणा यथाल अमानुष घटनेचा जाहीर निषेध
करण्यासावी मोर्चा काढला होता.
परवानगीविना कोम्बिंग ऑपरेशन करून सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतले व पोलिस ठाण्यात अमानुषपणे मारहाण केल्याने न्यायालयीन कोठडीत त्याचा
मृत्यू घडवून आणलेला आहे. या प्रकरणाची सखोल न्यायालयीन चौकशी करावी तसेच भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घोर अपमान केल्याने समाजामध्ये वाद निर्माण करून मागासवर्गीय समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. यासंबंधी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली. परभणी घटनेमधील आंबेडकरी तरुणांवरील गुन्हे राज्य सरकारने तातडीने मागे घेऊन त्यांना न्याय द्यावा याबाबत गंभीर दखल शासनाने न घेतल्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.