सुशासन सप्ताह अंतर्गत रोजगार हमी जलसंधारणाच्या कामाचा आढावा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/12/2024 8:40 PM

नांदेड  :-  19 ते 25 डिसेंबर सुशासन सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सुशासन सप्ताहमध्ये दिर्घकालीन व शाश्वत विकासाच्या अनेक उपक्रमांना स्थानिक प्रशासनाने गती देण्याला प्राधान्य दिले आहे. आज या सुशासन सप्ताह अंतर्गत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी जिल्ह्यातील यंत्रणेचा आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनामध्ये आज या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रामुख्याने यावेळी रोजगार हमी व जलसंधारणाच्या संदर्भातील आढावा घेतला. यात जलयुक्त शिवार, नरेगा, पांदण रस्ते, विहिर बांधकाम, गाळमुक्त तलाव, शेततळे, शोषखड्डे, घरकुल, चारा लागवड, बांबुलागवड तसेच जलसंधारणांतर्गत शेततळे, तुषारसिंचन, सुक्ष्मसिंचन, मृदजलसंधारण आदी संदर्भात आढावा घेण्यात आला. 

पावसाळा लागण्यापूर्वी यासंदर्भातील कामांचे नियोजन आवश्यक आहे. तसेच या आर्थीक वर्षातील पुढील तीन महिने बाकी असून यामध्ये खर्चाचे नियोजन आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने संपूर्ण यंत्रणेने याबाबत काम करावे, असे आवाहनही करण्यात आले. बैठकीला उपजिल्हाधिकारी (सामान्य) अजय शिंदे, उपजिल्हाधिकारी रोहयो ललीतकुमार वऱ्हाडे यांच्या विभाग प्रमुख उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या