अडचणीतील महिलांनी निवाऱ्यासाठी महिला राज्यगृहाशी संपर्क साधावा

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 23/12/2024 8:37 PM

नांदेड :- निराधार, विधवा, कुमारीमाता, परितक्त्या, अत्याचारित महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा व पुनर्वसनाची जबाबदारी शासन घेत आहे. अशा महिलांनी न बिचकता शासनाच्या सुविधांचा वापर करावा व निवाऱ्यासाठी संपर्क साधावा, असे आवाहन शासकीय महिला राज्य गृह नांदेड येथील अधिक्षक श्रीमती ए. पी. खानापूरकर यांनी केले आहे. 
 
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रित व अडचणीतल्या महिलांसाठी कार्यरत आहे. 18 ते 60 वर्षापर्यंतच्या निराधार, विधवा, कुमारीमाता, परितक्त्या, अत्याचारित महिला यांना याठिकाणी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुनर्वसनाची व्यवस्था केली जाते. संबंधित महिलांनी किंवा अशा पद्धतीच्या गरजू महिला लक्षात आलेल्या कोणत्याही नागरिकांनी यासाठी अशा महिलांना मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
 
समस्याग्रस्त 18 वर्षापुढील महिलांनी कोणावरही अवलंबून न राहता आपल्या या हक्काच्या शासकीय निवाऱ्याची सोय स्वत:साठी करून घ्यावी. अधिक माहितीसाठी माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह हॉटेल भाईजी पॅलेजच्या पाठीमागे शिवाजीनगर उड्डानपूल परिसर शिवाजीनगर नांदेड येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक 02462-233044 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अधिक्षक श्रीमती ए. पी. खानापूरकर यांनी केले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या