सांगली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने देशाचे नेते शरद पवार यांचा वाढदिवस ' उर्जा दिन' म्हणून साजरा तर अल्पसंख्यांक सेलच्या वतीने शरद पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 12/12/2024 5:32 PM

आज देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालय याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अध्यक्ष ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.देवराजदादा पाटील यांच्या हस्ते केक कापून आजचा वाढदिवस 'ऊर्जा दिवस' म्हणून साजरा करण्यात आला.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने 
सांगलीमधील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहरजिल्ह्याचे सर्व आजी माजी नगरसेवक,सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख तसेच महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.

     देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट चे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यांक शहर जिल्ह्याच्या वतीने विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात आलं 
गरजू बारा रुग्णांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन डॉक्टर वाघ सर यांच्या सुदर्शन डोळ्याच्या दवाखान्यामध्ये मोफत करण्यात आले, तसेच महानगरपालिकेच्या सावली बेघर निवारा केंद्र येथे इर्शाद भाई पखाली, व इमरान भाई सुतरिया यांच्याकडून बिस्किट व फळे वाटप करण्यात आले, तसेच उद्या अल्पसंख्यांक युवक च्या वतीने वाजिद खतीब यांच्या पुढाकाराने बेथेलेम नगर मिरज इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे, 
आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष नगरसेवक अयुब भाई बारगीर , कार्याध्यक्ष इरशाद भाई पखाली, उपाध्यक्ष जमीर भाई ऐनापुरे, उपाध्यक्ष अजहर सय्यद, युवकचे अक्षय भाऊ गायकवाड, उमर भाई शेख, वाजिद भाई खातीब, आश्रफ भाई चाऊस सोहेल कोकणे,इम्रान भाई सुतरिया, वाहिद खतीब, इम्रान भाई पठाण, सचिव अंजर फकीर, शफिक मुल्ला, एजाज काझी, फैयाज मुल्लानी इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या