कुपवाड दि १२,
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुश्ताक रंगरेज परिवाराच्या वतीने फळांचे आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले.
शरद पवारांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रंगरेज परिवाराच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात भगिनी निवेदिता यशवंतनगर कुपवाड येथे फळांचे वाटप झाले .याप्रसंगी भगिनी निवेदिताच्या व्यवस्थापिका नसीम काजी यांनी मुश्ताक रंगरेज परिवाराचे आभार मानले.त्यानंतर वृद्धसेवाश्रम कुपवाड मधील आश्रितांना कपडे तसेच फळांचे वाटप करण्यात आले यावेळी आश्रम मधील वृद्धांनी पवार साहेबांना दीर्घायुरोग्य चिंतिले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी वृद्धलोकांना आरोग्याच्या सोयी मिळवून देण्यासाठी कार्यरत राहू असं सांगितलं. प्रास्ताविक उत्तम आबा कांबळे यांनी प्रास्ताविक केले.प्रत्येक वर्षी नेहमी आश्रम आणि अनाथांना विविध प्रकारची मदत करत आहेत त्यांना निराधार लोकांचा आशीर्वाद लाभणार असल्याचे म्हटलं.संजय बजाज यांच्या हस्ते कपडे फळांचे वाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता हारगे,सागर घोडके,समीर कुपवाडे नंदू घाडगे, सुनीता जाधव,प्रनाली पाटील, माजी नगरसेविका विद्याताई कांबळे, शुभम जाधव, विजय माळी, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उत्तमआबा कांबळे वृद्धसेवाश्रमाचे अधीक्षक अहिंसक धोतरे,उपस्थित होते.