प्रत्येक शहरात वेगवेगळ्या व्यवसायाच्या अनुषंगाने प्रत्येकाच्या असोसिएशन्स आहेत त्या प्रत्येक वर्षी आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी व्यवसायातील समस्या याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करत असतात ते त्यांनी केलेच पाहिजे
त्याच पद्धतीने शहरात काही सामाजिक संघटना आहेत वेगवेगळे विषय हातात घेऊन त्यावर ते सुद्धा सातत्याने काम करत असतात.
मात्र काही विषय हे एकट्या दुखट्याने करण्यासारखे नसतात तसेच आपला व्यवसाय त्यातील समस्या ह्या जशा महत्वाच्या आहेत त्याच पद्धतीने जगण्यासाठी वास्तवाला सामोर जाण्यासाठी व आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी आपली जबाबदारी म्हणून आपण आता पर्यावरणावर सुद्धा सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे झालेले आहे.
संयुक्त राष्ट्र संघाचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर मधाव गाडगीळ यांची आज मुलाखत वाचली.
देशात व राज्यात कायदे करून काही सुधारणा झालेल्या नाहीत तर जन चळवळ जनरेटा यामुळेच काही अंशी फरक पडलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून पर्यावरण असेल नदी स्वच्छता असेल प्रदूषण महामंडळाच्या कामाची पद्धत असेल या सर्व बाबत आता आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे व एक दबाव गट करून याबाबत काम करणे आवश्यक आहे.
याचसाठी शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4.30 वाजता एक व्यापक मीटिंग स्वर्गीय डॉक्टर वसंतराव दादा पाटील यांच्या समाधीस्थळावर आयोजित करण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे.
नागरिक जागृती मंच, कृष्णा महापुर नियंत्रण समिती, स्पंदन फाउंडेशन, आभाळमाया फाउंडेशन,सरकार जलतरण ग्रुप,विसावा मंडळ, व अन्य सहभागी होणाऱ्या सामाजिक संघटना
संपर्क :- 9422408191,9096966444,9881066699,8275257575