नांदेड :- माहे सप्टेंबर 2024 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे 33 टक्केच्या वर नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून 812 कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. तरी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
*तालुकानिहाय बाधित शेतकरी संख्या व नुकसान भरपाईची रक्कम कोटी रुपयात आहे.*
नांदेड तालुक्यासाठी 34 हजार 641 बाधित शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 85 लाख रुपये, अर्धापूर तालुक्यासाठी 32 हजार 448 बाधित शेतकऱ्यांसाठी 32 कोटी 97 लाख रुपये, कंधार तालुक्यासाठी 73 हजार 650 बाधित शेतकऱ्यांसाठी 71 कोटी 27 लाख रुपये, लोहा तालुक्यासाठी 80 हजार 840 बाधित शेतकऱ्यांसाठी 84 कोटी 40 लाख रुपये, बिलोली तालुक्यासाठी 36 हजार 99 बाधित शेतकऱ्यांसाठी 46 कोटी 47 लाख रुपये, नायगाव तालुक्यासाठी 56 हजार 172 बाधित शेतकऱ्यांसाठी 56 कोटी 64 लाख रुपये, देगलूर तालुक्यासाठी 61 हजार 123 बाधित शेतकऱ्यांसाठी 50 कोटी 95 लाख रुपये, मुखेड तालुक्यासाठी 79 हजार 603 बाधित शेतकऱ्यांसाठी 55 कोटी 92 लाख रुपये, धर्माबाद तालुक्यासाठी 28 हजार 795 बाधित शेतकऱ्यांसाठी 27 कोटी 26 लाख रुपये, उमरी तालुक्यासाठी 34 हजार 38 बाधित शेतकऱ्यांसाठी 32 कोटी 70 लाख रुपये, भोकर तालुक्यासाठी 43 हजार 59 बाधित शेतकऱ्यांसाठी 52 कोटी 19 लाख रुपये, मुदखेड तालुक्यासाठी 30 हजार 812 बाधित शेतकऱ्यांसाठी 29 कोटी 35 लाख रुपये, हदगाव 74 हजार 228 बाधित शेतकऱ्यांसाठी 82 कोटी 27 लाख रुपये, हिमायतनगर 34 हजार 533 बाधित शेतकऱ्यांसाठी 44 कोटी 61 लाख रुपये, किनवट तालुक्यासाठी 57 हजार 702 बाधित शेतकऱ्यांसाठी 80 कोटी 42 लाख रुपये, माहूर तालुक्यासाठी 26 हजार 172 बाधित शेतकऱ्यांसाठी 35 कोटी 12 लाख असे एकूण नांदेड जिल्ह्यातील 7 लाख 83 हजार 915 शेतकऱ्यांसाठी 812 कोटी 386 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
दिनांक 01.01.2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.