खा.डॉ.अजित गोपछडे यांनी मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांना भेटून मराठवाड्याच्या विकासासाठी दिले निवेदन

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/12/2024 5:36 PM

नांदेड :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींजींची खासदार डॉ.अजितजी गोपछडे यांनी आज सकाळी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन मराठवाड्यातील कृषी,सिंचन,रेल्वे, महामार्ग रस्ते, आरोग्य विषयी विकासात्मक निवेदन दिले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व विषयांवर सकारात्मक प्रतिसाद देऊन सबंधित खात्यांना त्वरित निर्देश दिले आहेत.
खा.डॉ.अजितजी गोपछडे यांनी मणिपूर राज्य प्रभारी या नात्याने मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मणिपूर मधील विकास विषयक विषयावरील निवेदन दिले 
ऑर्गेनिक काळा तांदूळ, ऑर्गेनिक संत्री, हैंड मेड साडी, हैंडी क्राफ्ट, हैंड मेड चादरी व वस्त्रे भेट देऊन … मणिपूर मधील प्रसिद्ध लेंग्यान म्हणजे तेथील सन्मानाची शाल पांघरून मा. पंतप्रधानांचा यथोचित सन्मान केला. 

जगातील लोकप्रिय नेते, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी* यांना सर्व भेटवस्तू आवडल्या, विशेषत: मणिपुरी  लेंग्यान शॉल आज त्यांनी दिवसभर अतिशय आनंदाने परिधान केली, हा माझ्यासाठी सन्मान आहे असे ते म्हणाले. 
सर्व राज्य सरकारांच्या पाठिंब्याने गरिबांना अवयवदान आणि किडनी दानाचा लाभ गरजूंना मिळावा, महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या दुष्काळी मागास भागातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नांदेड जिल्ह्यातील बिलोली तहसील परिसरात ICAR अंतर्गत केंद्रीय दुष्काळी कृषी व गवत संशोधन संस्थेचे मिशन कार्यालय हैदराबाद धर्तीवर लवकरच स्थापन करण्यात यावे. रा स्व. संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक प पू डॉ. केशव बळीराम हेडगेवार जी यांचे मुळगाव कंदकुर्ती हे  शिरूर ताजबंद ते निजामाबाद या राष्ट्रीय महामार्गाला जोडणे, मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा नांदेडपर्यंत विस्तार  करण्यात यावा, मराठवाड्यात शालिवाहन काळातील बौद्ध, जैन, शीख, सनातन कॉरिडॉर आणि दुरिजम सर्किट तयार करण्यात यावे, बोधन-लातूररोड नवीन रेल्वे मार्ग (बोधन-बिलोली-मुखेड-शिरूर-ताजबंद-लातूररोड) लवकर सुरू करण्यात यावा. नांदेड-लातूररोड नवीनरेल्वे मार्ग निर्माण कार्य सुरु करावे, मराठवाड्यातील कृषी उत्पादनांची निर्यात वाढवणे आणि मणिपूर राज्य सरकारच्या सहकार्याने मणिपूरच्या हस्तकला , हातमाग ,  काळे तांदूळ,ऑर्गेनिक फळे व भाजी पाला उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यापक योजना तयार करणे, इम्फाळ ते  देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे नॉन स्टॉप फ्लाईट लवकरच सुरू व्हावी, मराठवाड्यातील गोदावरी नदी शुद्धीकरण व संवर्धन, मा.देवेंद्र फडणवीसांचे  स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासन नदीजोड योजनेंतर्गत घेतलेल्या स्तुत्य निर्णयांवर त्वरित कार्यवाही करावी. नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करावे …अश्या  सर्व विषयांवर सखोल चर्चा केली आणि या सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करू असे ठोस आश्वासन मा. पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी खासदार डॉ. अजितजी गोपछडे यांना त्यांच्या भेटी दरम्यान दिले.

Share

Other News

ताज्या बातम्या