कर्जाची एकरकमी परतफेड करणाऱ्यांना लाभार्थ्यांना थकीत व्याजात 50 टक्के सवलत

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 11/12/2024 5:20 PM

नांदेड :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (ओटीस) देण्याबाबत सुधारीत एकरकमी योजना 31 मार्च 2025 पर्यत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड- 431605 किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 220865 वर संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या