शालेय वार्ता या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडेल

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 11/12/2024 7:34 AM

शालेय वार्ता या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडेल असे प्रतिपादन माण तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी केले.


आरटी आय न्यूज नेटवर्क 
गोंदवले :

जिल्हा जिल्हा परिषद केंद्र शाळा वावरहिरे येथे मुख्याध्यापक हणमंतराव अवघडे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या शालेय वार्ता या न्यूज चॅनलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, जगात ज्या घडामोडी घडत आहेत याचे ज्ञान शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना होणे आवश्यक आहे त्यामुळे विद्यार्थी अधिक बहुआयामी बनतील आणि देशाचे सक्षम नागरिक घडतील. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच सजग राहून परिसरातील घटनांचे निरीक्षण करावे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी तयार केलेल्या हक्काच्या व्यासपीठाचे त्यांनी कौतुक केले विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेले चॅनल हे महाराष्ट्रातील पहिलेच असावे असे उद्गार काढून भविष्यात या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी अधिक उपक्रम राबवावेत असे आवाहन त्यांनी केले. 
गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी शिक्षण विभागाच्या वतीने जे उपक्रम राबविले जातात त्याबद्दलची माहिती देऊन व्हिलेज गोज टू स्कूल ही संकल्पना राबवण्यासाठी ग्रामस्थ व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. विविध शैक्षणिक उपक्रमात ही शाळा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
गावच्या सरपंच शैला राऊत यांनी शालेय कामकाजाचे कौतुक करून शालेय गरजा पूर्ण करण्यासाठी सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाईल असे सांगितले. 
यावेळी गटविकास अधिकारी यांनी मुलाखत घेणाऱ्या अँकर प्रगती वाघमोडे हिचा गौरव केला.विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
मुख्याध्यापक हणमंतराव अवघडे यांनी शाळेत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देऊन शाळेतील आनंद बडवे, सुनीता खरात, रेखा पोरे, मनीषा साबळे या शिक्षकांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी ध्यास घेवून काम असल्याचे सांगितले. 
कार्यक्रमास सहाय्यक गट विकास अधिकारी चंद्रकांत खाडे साहेब, केंद्रप्रमुख महेंद्र हजारे, ग्रामपंचायत सदस्य पूनम खुस्पे , शाळा व्यवस्थापन समितीचे लखन खूस्पे ,पल्लवी जाधव, पत्रकार एकनाथ वाघमोडे, तुळशीराम यादव, पौर्णिमा कठाणे, गौरी कचरे ,भाग्यश्री जंगिलवाड , नारायण कचरे , नामदेव वाघमोडे, शालन मोहिते, कुमारी रेश्मा पांढरे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद बडवे यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख महेंद्र हजारे यांनी मानले.

Share

Other News

ताज्या बातम्या