*रस्ता नक्की कोणी केला सांगली महानगरपालिका बांधकाम विभाग म्हणते हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आणि सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणत्यात हा रस्ता सांगली महानगरपालिकेने केला*
हा रस्ता नक्की कोणी केला मग -दैनिक पुढारी मध्येआज प्रसिद्धी झाली आहे. मिरज मधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते मिरज -सांगली त्यासाठी दोन कोटीचे काम झाले आहे सदर रस्त्याचे काम गेल्या वर्षी झाले होते वर्षभराच्या रस्त्याची चाळण झाले आहे रस्त्यामध्ये खड्डे पडले आहेत अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, रस्ता पूर्ण खचत चालला आहे याला पूर्ण ठेकेदार असून त्याच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी मी लोकहित मंचच्या वतीने केली आहे बाबत मी स्वतः महानगरपालिकेची संपर्क साधला असता त्याने असं उत्तर दिले की सदर रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज यांनी केले आहे मग मी स्वतः सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणतात की हे काम सांगली महानगरपालिकेने केले आहे दोन्हीकडून उडवा उडवीची उत्तर दिले जातात नेमके काम महानगरपालिकेने केले सार्वजनिक बांधकाम विभागाने केले मोठा प्रश्न पडला आहे ठेकेदाराला पाठीशी घालायचं काम चालू आहे टक्केवारी खाऊन मोकळी झाली आहे ना जनतेशी देणे घेणे काही नाही तेरी भी चूप मेरी भी चुप असा प्रकार जोरात चालू आहे तरी याचे उत्तर आम्हाला लवकरात लवकर द्यावे.
-मनोज भिसे
अध्यक्ष, लोकहित मंच सांगली.