ही कल्पना प्रशासनाने मनपा क्षेत्रात वापरली तर....

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 01/12/2024 10:20 AM

आजच्या दैनिक सकाळमध्ये कर्नाटकच्या राजधानी बेंगलोर मध्ये भटक्या कुत्र्यांच्या समस्या बाबत स्थानिक महानगरपालिका प्राणी मित्र सामाजिक संस्था यांच्या मदतीने भटक्या कुत्र्यांना खायला देणे हा उपक्रम एक महिनाभर राबवलेला आहे त्यात काही अंशी कुत्र्यांचा आक्रमकपणा व अंगावर जाणे चावणे ह्या प्रकारात घट झालेली दिसत आहे 
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका माननीय आयुक्त साहेबांनी बेंगलोरच्या आयुक्तांची संपर्क साधून अशा पद्धतीने आपल्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत त्यांना खायला देणे अथवा त्याचे नियोजन करण्यासाठी प्राणी मित्रांच्या बरोबर आम्ही सुद्धा नागरिक जागृती मंच मार्फत काम करायला तयार आहोत तसेच अन्य सामाजिक संस्था यांना बरोबर घेऊ हॉटेल चालक-मालक असोसिएशन असेल सगळ्यांना बरोबर घेऊन असा प्रयोग राबविला तर फार बरे होईल असे वाटते.

सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.

Share

Other News

ताज्या बातम्या