शहर पोलिस ठाण्याच्या कारवाईत ४ लाख ४० हजार रुपयांच्या मालासह एका आरोपीला अटक
चंद्रपूर: दिनांक २९/११/२०२४ २०२४ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार हे पो स्टे हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असता मुखबिरव्दारे खबर मिळाली की, नेताजी चौक, बाबुपेठ वार्ड, चंद्रपुर येथे एक इसम हा आपले स्विफ्ट डिझायर गाडी क MH-34-AA-4275 नी अवैध्य सुगंधीत तंबाखुची वाहतुक करीत असल्याबाबत माहिती मिळाल्याने अन्न सुरक्षा अधिकारी व कर्मचारी तसेच पंच व पोस्टॉफ सह बाबुपेठ वार्ड येथे जावुन नाकेबंदी केली असता आरोपी नामे मंगेश गणपती मादासवार, वय ३० वर्ष, रा. चिंतलधाबा, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपुर हा ग्रे कलरची स्विफ्ट डिझायर गाडी क MH-34-AA- 4275 कि.अं. ४,००,०००/- रू मध्ये अवैध्द सुगंधीत तंबाखु मजा १०८ हुक्का शिशा तम्बाकुचे २०० डब्बे कि. ४७,०००/- रू असा एकुण ४,४७,०००/- रू चा मालसह मिळुन आल्याने त्याचेवर पोस्टे अप क ९९१/२०२४ कलम ३० (२) (अ), २६ (२) (1), २६ (२) (IV), ५९ अन्न व सुरक्षा मानके अधि. २००६ तसेच भारतीय न्यास संहिता सन २०२३ अन्वये २२३, २७४, २७५, १२३ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री. सुदर्शन मुमक्का सा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीमती रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी, श्री सुधाकर यादव सा., मा.पोलीस निरीक्षक, प्रभावती ऐकुरके, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख पो.उपनि. संदीप बच्छिरे, पोहवा सचिन बोरकर, संतोष कनकम, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, शाहाबाज सय्यद, विक्रम मेश्राम, राजेश चिताडे, इम्रान खॉन, दिलीप कुसराम, रूपेश रणदिवे, इरशाद शेख, मपोअं. सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केली आहे.