मिरज म्हैसाळ रोड वरील उड्डाणपुलाखाली झोपडपट्टीत राहणारे शिवशरण कुटुंब, सर्व मिरज शहराच्या गटारीचे पाणी दारातून जाते कोणतीही सोयी सुविधा नसलेला भागातील प्रतिकूल परिस्तिथि। त एका मुलीने पोलीस होण्याचे ध्येय बाळगले, तिचा झोपड़पट्टी ते रायगड पोलीस असा प्रवास, कठोर संघर्षातून पोलीस भरती च स्वप्न साकारून दाखवले, तिचे नाव श्रुती दिलीप शिवशरण, तिने बारावीपर्यंत शिक्षण बापूजी साळुंके कॉलेजमध्ये घेतले झोपडपट्टीत पत्राच्या घरात तिचे वडील दिलीप शिवशरण ट्रक ड्रायव्हर आई नर्सिंग चे काम करते व मोठा भाऊ असे छोटे कुटुंब मुलीने लहानापासून पोलीस होण्याची स्वप्न बळावली आणि ते पूर्ण करण्यासाठी वडील रात्रंदिवस काबाड कष्ट करून मुलींच्या स्वप्नांसाठी आपली ड्रायव्हरची नोकरी रात्रंदिवस करू लागला, घराचे जावलील मुल- मुली पोलीस भरतीच्या सरावासाठी बामनोली तील भैरवनाथ स्पोर्ट्स फाउंडेशन येथे जातात है तिच्या लक्षात आल्यानंतर तिने तिथे जाऊन पोलीस भरतीची तयारी करण्याची ठरवली तिची मैदानावरील कष्ट करण्याची तयारी बघून सरांनी तिला पूर्णपणे मार्गदर्शन करावे ठरविले लेखी पेपरचा सराव व मैदानी चाचणी यामध्ये सांगड घालत त्याच्या यशाचा दरवाजा उघडून दिला अभ्यासाची ओढ नसणारी मुलगी अभ्यासात टिकेल का नाही याची कल्पना आई-वडिलांनापण गुरु तू गुरु असतो गुरुचे मार्गदर्शन तिला मोलाची प्रशांत बामणे प्रशिक्षक भैरवनाथ स्पोर्ट फाउंडेशन बामनोली यांच्याकडून मिळाले त्यांनी सांगितलेल्या पायरीवर चढू लागली सकाळी प्रॅक्टिस करून आल्यानंतर दहा ते बारा लायब्ररी मध्ये अभ्यास करू लागली तिथून पुढे 12 ते दोन लेखी पेपरचा क्लास तेथून परत लायब्ररीमध्ये जाऊन रात्री दहापर्यंत अभ्यास करू लागली एकदा सकाळी घर सोडले हे रात्री अकरा वाजता असते घरी जावू लागली आपल्या घरची परिस्थिती काय आहे हे तिला माहीत होते दरवर्षी येणाऱ्या पूरा मध्ये आपली झोपडी पूराच्या पाण्याखाली जात होती है तिने स्वतःच्या डोळ्याने लहानपणापासून बघत होते एकच स्वप्न उराशी बाळगले होते की नोकरी लागून आई-वडिलांना स्वतःची घर बांधून देणे या एका स्वप्नासाठी फक्त साडेअठरा वर्षांमध्ये मुलगी पोलीस भरती झाली कमी वयामध्ये पोलीस भरती होणारी ही दुर्मिळच मुलगी आहे तिची जिद्द आणि चिकाटी बघून तिला सरानी चांगले मार्गदर्शन केल्यामुळे आज ती रायगड पोलीस येथे भरती झाली आहे ती आता याचे तुरची पोलीस ट्रेनिंग सांगली येथे ट्रेनिग घेत आहे काल तिचा संभाजीनगर काराग्रहचा पन निकाल लावला त्या यादि मधे ही तिचे नाव आले तिचा हा थक्क करणारा प्रवास अनेक मुला-मुलींना प्रेरणादायी नक्कीच ठरेल...