राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत पोलिस आयुक्त संदिप कर्णीक यांची भेट

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 28/11/2024 2:10 PM

नाशिक -राष्ट्रवादी महिलाकाँग्रेसच्या शहराध्यक्ष योगिता आहेर यांच्यावर काल सातपुर परिसरात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत पोलिस आयुक्त संदिप कर्णीक यांची भेट घेतली.

घडलेला प्रकार फार गंभीर असुन शहरात इतरही भागांमध्ये अशा प्रकारचे गुन्हे वाढत चालले असुन या प्रकरणातील गुन्हेगारांवर कडक कार्यवाही करुन योग्य ते गुन्हे दाखल करण्यात यावे  व तसेच  सातपुर भागात वाढत्या गुन्हेगारी व गांजा रॅकेट यावर कारवाई करावी अशी मागणी प्रेरणा बलकवडे यांनी बोलताना केली.  शहरात म्हसरुळ, कामगारनगर, अंबड व इतर भागात देखील टवाळखोरांकडून होत असलेल्या त्रासाची चर्चा महिलांनी पोलिस आयुक्तांसोबत केली. 

पोलिस आयुक्त कर्णीक साहेब यांनी दोन व्यक्ती ताब्यात आहेत व त्यात सहभागी इतरांवर पण तात्काळ कारवाईचे आदेश देत गरज वाटल्यास सातपुर विभागासाठी वरिष्ठ पोलिस निरिक्षक बदलण्याचेही आश्वासन यावेळी दिले.

यावेळा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्य़ योगिता आहेर, सायरा शेख, निर्मला सावंत यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतर पदाधीकारी उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या