राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी ई. व्ही. एम. च्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल : शिवसेना युवा नेते भगवानदास केंगार

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 28/11/2024 12:11 PM

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल अनपेक्षित व धक्कादायक असा निकाल लागला आहे.
अनेक मतदारसंघात AVM मशिन मध्ये काही गावात गावातील मतदारांच्या पेक्षा जास्त मतदान व काही गावात कमी मतदान झाल्यामुळे संभ्रम निर्माण झाली आहे.अनेक ठिकाणी AVM मशिन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतमोजणीत अडथळा निर्माण झाला.या बाबत अनेक विरोधी पक्षातील उमेदवारांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला. महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील व जनतेच्या मनात शंका निर्माण झाल्यामुळे निवडणूक आयोग या संदर्भात काही खुलासा का करत नाही.?असा सवाल नागरिक करत आहेत.आयोगाला अनेक ठिकाणी जनतेच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे म्हणून निवडणूक आयोगाने आयोगाच्या वेबसाईटवरून महाराष्ट्रात विधानसभेतील आकडेवारी वेबसाईटवरून डिलीट करण्यात आलेली आहे संदर्भात नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावना का समजून घेत नाही व याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला निवडणूक आयोग का देत नाही.निवडणुक आयोग केंद्रीय सत्ताधाऱ्यांच्यां दबावाखाली काम करत आहे का ? अशी शंका महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेला झाली आहे. महाराष्ट्रात पार पडलेल्या 288 विधानसभेचा निकालाची माहिती निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. व भविष्यात AVM मशीन वर मतदान न घेता बॅलेट पेपर वर निवडणुका व्हावेत अशी मागणी जोर धरू लागलेली आहे.
निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेऊन जनतेच्या मनातील शंका दूर करावी अशी मागणी शिवसेना युवा नेते तथा सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष भगवानदास केंगार यांनी एका पत्रकाद्वारे हि मागणी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या