अमृतमहोत्सवी ७५ वा भारतीय संविधान दिन मातंग समाजाच्या वतीने प्रास्ताविकेचे वाचन व संविधान रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेत मोठ्या उत्साहात संपन्न

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/11/2024 10:49 AM


    महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप भाषा,शेकडो विधी,हजारो विधान या सर्वांना एकत्र जोडून सर्व जाती,धर्म,पंथाला एकाच समानतेच्या चौकटीत बांधणारं मौलिक संविधान या भारताला 26 नोव्हेंबर 1949 रोजी दिलं आज 75 वा अमृत महोत्सवी भारतीय संविधान दिन मातंग समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सर्जेराव कांबळे निवास कांबळे बाळासो मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अतुल नांद्रेकर सहायक प्रकल्प अधिकारी ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यांनी संविधाना विषयी उत्तम माहिती व मार्गदर्शन केले.पै.विक्रमभैय्या मोहिते यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानाचे महत्त्व आणि संविधानाचे रक्षण करण्याची गरज विस्ताराने सांगितली आणि अमृत महोत्सवी संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी सर्व उपस्थित समाज बांधवांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करत संविधान रक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली.यावेळी सुमित कांबळे,केशव मोहिते,निलेश कांबळे,अभिषेक मोहिते,बाबासो काकडे,सोमनाथ सुवासे,कौस्तुभ मोहिते,सुकुमार कांबळे,अवधूत कांबळे आदी समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते..!!

Share

Other News

ताज्या बातम्या