आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
सातारा दि. : 26 नोव्हेंबर, संविधान दिनी संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सन 2024-25 या अमृत महोत्सव वर्षात "घर घर संविधान" उपक्रम साजरा करण्यात येत आहे. त्यास अनुसरून भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मुल्ये देशाच्या सर्व नागरिकांपर्यंत पोहचावित यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते 10 या कालावधीत श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल, सातारा ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नगरपरिषद समोर, सातारा या मार्गावर संविधान दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीची सुरूवात प्रतापसिंह हायस्कूल (राजवाडा), गांधी मैदान येथून राजपथ मार्गे तालीम संघ ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी दिंडीचा समारोप करण्यात येणार आहे. या दिंडीमध्ये श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज हायस्कूल, सातारा, कै. सौ. सत्यभामाबाई काळे, स्त्री शिक्षण मंदीर (कन्याशाळा), सातारा. व राजर्षि छत्रपती शाहू महाराज वसतिगृह सातारा येथील विद्यार्थी तसेच सामाजिक न्याय व विशेष विभाग अंतर्गत कार्यरत असणारी सर्व महामंडळे, बहुजन कल्याण विभाग, सातारा, जिल्हा जाती पडताळणी प्रमाणपत्र समिती, सातारा या कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचा सहभाग असणार आहे.
या दिंडीमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन, सुनिल जाधव, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी केले आहे