भगूर येथील श्री एकनाथराव सहादु शेटे कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित आणि एसएमबीटी आयुर्वेद महाविद्यालय इगतपुरी नाशिक ह्यांच्या वतीने विद्यार्थी आरोग्य तपासणी शिबिर दि. २२ नोहेंबर २०२४ रोजी विद्यार्थ्यांचे शारीरिक तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले या शिबिरासाठी एसएमबीटी आयुर्वेद महाविद्यालयाच्या डॉक्टर विद्या जाधव आणि त्यांच्या सहकारी यांची टीम महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या शारीरिक तपासणीसाठी उपस्थित होते त्यांनी विद्यार्थिनींना व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी बद्दल मोलाचे मार्गदर्शन केले वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास व आरोग्य संदर्भात मार्गदर्शन केले.या मुलींना येणाऱ्या शारीरिक आरोग्य विषयक तसेच मानसिक, भावनिक स्वतःच्या अडचणी सोडविताना योजण्याचे उपाय आणि समस्यांवर समर्थपणे मात करावी. स्वतःचे संरक्षण करताना मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम असणं गरजेचं आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रास्ताविक प्रा प्राजक्ता जोशी यांनी केले महाविद्यालयाचे प्राचार्य मराठी विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. मृत्युंजय कापसे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थिनी, प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला.