संविधान अमृत महोत्सव दिन
चंद्रपूर:- आज दि.26 नोव्हेंबर 2024 रोजी स्व.गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय ,नांदगाव पोडे येथे भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल *संविधान अमृत महोत्सव दिन* कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सर्वप्रथम शाळा समितीचे अध्यक्ष रामदास पा. निमकर ,शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक नरेंद्र बोबडे यांनी डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.याप्रसंगी गावात *संविधान रॅली* काढण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात प्राचार्य नरेंद्र बोबडे यांनी संविधान दिनावर आपले विचार व्यक्त केले,कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सारिका कुचनकर यांनी केले.