निवडणुकीत लाच देणे अथवा घेणेबाबत तक्रार देण्यासाठी 1950 टोल फ्री क्रमांक सुरु

  • विजय जगदाळे (Pingali)
  • Upadted: 18/10/2024 9:20 AM


आरटी आय न्यूज नेटवर्क 
(विजय जगदाळे)


सातारा दि. :  लाच घेणारा व देणारा  दोहोंच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी आणि मतदारांना धमकी देणा-या व धाकदपटशा  करणा-याविरोध कारवाई करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.  सर्व नागरिकांना कोणतीही  लाच स्वीकारण्यापासून दूर राहण्याची आणि जर कोणी लाच देत  असेल अथवा लाच देण्या घेण्याबाबत कोणतीही माहिती असेल अथवा मतदारांना धमकी/धाकदपटशा करीत असेल  तर याबाबत जिल्हयाच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील सर्व दिवशी २४ तासात  कधीही १९५० या टोल फ्री नंबरवर त्याची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी, सातारा तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. सदरचा टोल फ्री क्रमांक सर्व दिवशी 24 तास सुरु राहणार आहे.
भारतीय दंड संहितेच्या कलम १७१ ख नुसार, निवडणूक प्रक्रियेच्या काळात त्याच्या मतदानाचा हक्क वापरण्याकरिता व्यक्तीला प्रलोभन दाखवण्याच्या कोणतेही पारितोषिक रोख रक्कम किंवा या  प्रकारचे देणारी किंवा स्वीकारणारी कोणतीही व्यक्ती, एक वर्षापर्यंतच्या कारावासास किंवा  दंडास किंवा दोंहास शिक्षापात्र असेल.   तसेच भारतीय दंड संहितेचे उल्लंघन करणारे  एक  वर्षापर्यंतच्या कारावासास किंवा दंडास किंवा दोन्हीस शिक्षा पात्र ठरतील.  

Share

Other News

ताज्या बातम्या