ग्रामीण भागातील जिराईत बळीराजाचे दरडोई उत्पन्न वाढीसाठी मोहीम हाती घेणार : चंदनदादा चव्हाण

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/10/2024 8:49 AM

देशात आणि महाराष्ट्रात पिकाऊ शेतीचे क्षेत्र कमी होत आहॆ. त्यासाठी ग्रामीण भागातील जिरायत क्षेत्रास सरकारने योग्य त्या सुविधा देऊन बळीराजाचे दरडोई उत्पन्न वाढावे यासाठी मोहीम हाती घेणार असे प्रतिपादन चंदनदादा चव्हाण यांनी केले आहे.

लोक उद्योग व्यवसासाठी शहारा कडे आकर्षित होत आहेत. सरकारने शेती साठी शेतकऱ्यांना शेती तज्ञा कडून योग्य मार्गदर्शन होणे अपेक्षित आहॆ. हजारो हेक्टर जमिनी अध्यापही ओलिता खाली आल्या नाहीत. त्या आणाव्या लागतील. शेती पूरक व्यवसायला सर्वोतपरी मदत करावी लागेल. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हभी भाव सरकार देत नसल्याने शेती उद्योग मोठ्या संकटात सापडला आहॆ. कष्ट करणाऱ्या बळीराजाचे जगण्याच्या मार्गांवर सरकारच्या वेळ काढू धोरणा मुळे शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झालं आहॆ. म्हणून सरकारने बियाणा पासून पाणी ते खते औषधे यात नाममात्र दराची आकारणी करून पुढील दहा वर्षाचे अन्न धान्य मुबलक आपल्या कडे निर्माण करण्यासाठी योग्य धोरण आखावे लागेल तरच भविष्यातील अडचण दुर होण्यास मदत होणार आहॆ.

भविष्यात कोरोना सारखे, १९७२ सारखा दुष्काळ, नवनवीन रोग ग्रस्त स्थिती निर्माण झाल्यास माणसांना माणूस खाण्याची परिस्थिती निर्माण होण्याची भीती आजच दिसत आहॆ. हे सरकारने लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहॆ. समृद्ध शेतकरी या देशात राज्यात बनला तरच वाढत्या लोकसंखेला आपण आळा घालू शकतो. वाढत्या लोकसंखे बरोबर पिकाऊ जमिनीचे ही क्षेत्र वाढले तर भविष्यातील अन्न धाण्याचा धोका टळू शकेल. हा प्रश्न हाती घेऊन जयहिंद सेनेची वाटचाल राहणार आहॆ. हे जोपर्यंत सत्यात उतरवत नाही तो पर्यंत सरकारशी संघर्ष करण्यासाठी मागे जयहिंद सेना हटणार नाही. जयहिंद 🙏🇮🇳. 

चंदनदादा चव्हाण : पक्षप्रमुख, जयहिंद सेना. महाराष्ट्र.

Share

Other News

ताज्या बातम्या