सांगली सिव्हील चौक गेटच्या समोर साचले पाण्याचे तळे, मनपाचे कायम दुर्लक्षच, मनपाने योग्य नियोजन करावे: लोकहित मंच

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/10/2024 11:42 AM

 प्रतिनिधी : सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील गेटच्या समोर काल पाऊस झाल्यामुळे दिगंबर मेडिकल च्या समोर पावसामुळे असे पाण्याचे रोडवरती तळे साचले आहे या रोडवरती अशी कायम परिस्थिती असते महानगरपालिका याचं काही नियोजन केले नाही रस्ता पण नादुरुस्त झाला आहे सदर रोड वरती खड्डे पडल्यामुळे या भागात असेच पाणी साचून राहते त्यामुळे पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो याचे महानगरपालिकेने अद्याप काही नियोजन केले नाही याचे कारण काय? मुसळधार पाऊस पडल्यामुळे वेळोवेळी या रोडवरती असे तळ्याचे स्वरूप निर्माण होते आणि रोड वरती जसे पाणी साठून राहते महानगरपालिकेने याच्यावर उपाय योजना का करीत नाहीत या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे सदर रोड वरती येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हे पाणीच असल्यामुळे यायला जायला त्रास होत आहे  तरी महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाने या गोष्टीची गंभीर दखल घेऊन याची योग्य ती उपाय योजना लवकरात लवकर करावी अशी लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे यांनी मागणी केली आहे

Share

Other News

ताज्या बातम्या