श्री एकनाथराव शेटे कला वाणिज्य महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 16/10/2024 12:45 PM

श्री एकनाथराव सहादू शेटे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात आज दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या स्मृती प्रित्यर्थ वाचन प्रेरणा दिना निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन नूतन विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक आणि शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे सदस्य कायम शिक्षण सेवक प्रतिनिधी माननीय प्रा.श्री गणेश चव्हाण सर यांच्या हस्ते झाले. या ग्रंथ प्रदर्शनास नूतन विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेजचे माननीय प्राध्यापक साबळे सर आणि माननीय प्राध्यापक दिघे सर यांची ही उपस्थित लाभली. माननीय प्राध्यापक गणेश चव्हाण सरांनी उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना ग्रंथां प्रदर्शनी संदर्भात मार्गदर्शन केले त्यांनी अतिशय ओघवत्या शैलीत विविध प्रकारचे ग्रंथ जोपासून महाविद्यालयाचे वाचनालय अधिक समृद्ध करावे असे प्रतिपादन केले. यावेळी
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर मृत्युंजय दिनेश कापसे सर यांनी आलेल्या मान्यवरांचे महाविद्यालयातर्फे स्वागत केले. या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन प्राध्यापक अशोक बहिरम आणि प्राध्यापिका प्राजक्ता जोशी यांनी केले तर प्राध्यापिका रोहिणी जगताप आणि प्राध्यापिका मेघना काळे यांचे आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले..

Share

Other News

ताज्या बातम्या