महाराष्टात आचारसंहिता लाग, नियमांचे पालन करावे लागणार : मारुती देवकर

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 15/10/2024 10:34 PM

महाराष्ट्रात आचारसंहिता लागू :- मारुती देवकर
      केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यासोबतच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.

        महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे
     विधानसभा निवडणुकीची वैशिष्ट्यं काय?
- महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार, ४.९७ कोटी पुरुष मतदार, ४.६६ कोटी महिला मतदार
- १.८५ कोटी युवा मतदार, २०.९३ लाख नवमतदार
- २८८ मतदारसंघ, २५ एसटी, २९ एससी
- १ लाख १८६ पोलिंग स्टेशन, ५७ हजार
- मतदान प्रक्रियेचे पूर्ण चित्रिकरण होणार
- ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरुन मतदानाची सोय
- गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना माहिती वृत्तपत्रात द्यावी लागणार
- पैसे, ड्रग्ज, मोफत वस्तू किंवा दारु यांचे वाटप होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष मारुती देवकर यांनी दिली.

Share

Other News

ताज्या बातम्या