"तलाठी पदाचे पदनाम बदलून ग्राम महसूल अधिकारी"

  • Nitin Ganorkar (Paratwada)
  • Upadted: 18/10/2024 8:25 AM

अमरावती: महसूल विभागातील तलाठी पदाचे पदनाम बदलून "ग्राम महसूल अधिकारी" करणेबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांनी 14 ऑक्टोबर 2024 रोजी शासन क्र.संकीर्ण 2024/प्र.क्र.213/ई10 निर्णयानुसार तलाठ्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 14,76,149,150,151,153,154 या कलमात नमूद केलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. मा.जिल्हाधिकारी यांनी नमूद केलेले नोंदणीपत्रके रजिस्टरे व जमाखर्च लिहिण्याचे काम तलाठ्याकडे असते. जमीन महसूल व जमीन महसूल थकबाकी म्हणून सर्व कारणे रकमा त्यास गोळा कराव्या लागतात. कोणत्याही वरिष्ठ महसूल अधिकारी किंवा पोलीस सांगेल ते गावासंबंधी लिहिण्याचे काम तलाठ्यास करावे लागते. महसूल विभागातील तलाठी संवर्गाच्या पदनामात बदल करून "ग्राम महसूल अधिकारी" असे  पदनाम करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांच्याद्वारे करण्यात येत होती. महसूल विभागातील तलाठी संवर्गातील पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे पदनाम करण्याचे शासनाने निर्णय घेऊन तलाठी (गट क) संवर्गातील पदनामात बदल करून ग्राम महसूल अधिकारी असे पद नाव करण्यास काही अटींच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.
अटी: पदनाम बदलामुळे भविष्यात वेतनश्रेणी वाढी संदर्भात प्राप्त होणारे कोणतीही मागणे विचारात घेतले जाणार नाही. तसेच पदनाम बदलानंतर वेतनश्रेणी /वेतनस्तर देण्याच्या अनुषंगाने भविष्यात वेतन त्रुटी समिती पुढे मागणी करता येणार नाही व अशी मागणी विचारात घेतल्या जाणार नाही.

Share

Other News

ताज्या बातम्या