सांगली येथील शासकीय औध्योगिक प्रशिक्षण संस्थेस साहित्यरत्न सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे नाव

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/10/2024 9:11 PM

विख्यात साहित्यिक सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस देण्याचा निर्णय महाराष्ट्र* सरकार काही दिवसाआधी घेतला , या निर्णयाचे सर्वच स्तरावरून सांगली जिल्ह्यामध्ये स्वागत होत आहे, या निर्णयाचा अनुषंगाने आज नामकरण सोहळा आमदार सुधीर दादा गाडगीळ व मा. शेखर इनामदार साहेब यांच्या शुभ हस्ते पार .
मोठ्या उत्साहात शासकीय औद्योगिक संस्थेस आज साहित्यरत्न सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात आलं..
यावेळी बोलताना मा. आकाश तिवडे मेजर म्हणाले साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे हे जग विख्यात साहित्यिक आहे, सांगली जिल्ह्याचे महाराष्ट्राचे तसेच या देशाचे नाव जगभरामध्ये साहित्य क्षेत्रात उंच करण्याचं काम साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी केलेला आहे, जगातील अनेक भाषांमध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य प्रकाशित झाला आहे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस अण्णाभाऊंचं नाव देऊन अण्णाभाऊंच्या कार्यकर्तृत्वाचं गौरव केल्याबद्दल समस्त मातंग समाज सांगली जिल्हा व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे   आभार मानले, तसेच भारतभर जी सध्या मोठ्या प्रमाणात अण्णाभाऊंच्या अनुयायांची मागणी आहे, ती म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा. ही मागणी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, तेलंगणा या प्रमुख राज्यातून मोठ्या प्रमाणात होत आहे, 
तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य देशपांडे सर यांना आचारसंहिता झाल्यानंतर आपण नामकरण सोहळा मोठ्या प्रमाणात, मोठ्या उत्साहात घेऊ अशी देखील सूचना आकाश तिवडे यांनी केली व नामकरणाच्या सोहळ्यास निमंत्रण देऊन सत्कार केले बद्दल प्राचार्यांचे आभार मानले .

Share

Other News

ताज्या बातम्या