आरटी आय न्यूज नेटवर्क
(विजय जगदाळे)
वडूज दी: वडूज परिसरात पोलिस असल्याची बतावणी करून अनेकांना गंडा घालणाऱ्या दोघा संशयितांना वडूज वाहतूक पोलिसांनी जेरबंद केले. शिराज जाफर इराणी व मुस्लीम नासर इराणी, अशी त्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सोमवारी सकाळी आकराच्या सुमारास वडूज शहरातील स्टेट बँकेसमोर दुचाकीवर हेल्मेट घातलेली व तोंडाला रुमाल बांधलेली व्यक्ती संशयास्पद आढळली. वाहतूक सिराज इराणी मुस्लीम इराणी पोलिसांनी त्याच्या पाठलाग करत त्याच्यावर नजर ठेवली. तेव्हा त्या दोघांकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. वाहतूक पोलिस अजय भोसले व गजानन वाघमारे यांनी त्यांना नागरिकांच्या मदतीने पकडले. वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक घनश्याम सोनवणे आणि वाहतूक पोलिसांच्या तत्परतेने कित्येक महिने पसार असलेले तोतया पोलिस अखेर जेरबंद झाले. यावेळी एका संशयिताने प्लास्टिक पिशवी तोंडात टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहतूक पोलिस वाघमारे यांनी तोंड दाबून धरल्यामुळे संबंधिताला ती पिशवी गिळता आली नाही. त्या पिशवीमध्ये दोघांचे ही बनावट पोलिस ओळखपत्र असल्याचे सापडले. या तोतया पोलिसांवर सुमारे वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत. त्या दोघांकडून पोलिसांनी एक दुचाकी ताब्यात घेतली आहे.