अमरावती: अचलपूर मतदार संघातून इतिहासाचे अवलोकन करताना काही ऐतिहासिक बाबी स्पष्टपणे जाणवतात, जसे 21ऑक्टोबर 1951 रोजी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघाची स्थापना दिल्लीतील राघोमल कन्या माध्यमिक विद्यालयात झाली. त्याचा ध्वज म्हणून आयताकृती भगवा ध्वज स्वीकारण्यात आला आणि त्यावर लिहिलेला 'दीपक' निवडणूक चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आला. याच उद्घाटन सत्रात पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीरनामाही मंजूर करण्यात आला. मार्च 1965 मध्ये पाकिस्तानने कच्छमधील कानजरकोट ताब्यात घेतले होती, याला जनसंघाचा कडाडून विरोध होता. जुलै-ऑगस्टमध्ये जनसंघाने देशव्यापी निदर्शनाची योजना आखली. देशभरात सुमारे एक लाख ठिकाणी निदर्शने झाली आणि 16 ऑगस्ट रोजी कच्छ कराराच्या विरोधात देशाच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठ्या निदर्शनासाठी देशाच्या प्रत्येक भागातून 5 लाखांहून अधिक लोक दिल्लीत जमले. 'फौज ना हरी, कौम ना हरी, हार गई सरकार हमारी' अशाप्रकारे इतिहासाचे पाणी भराभर पलटत गेली.परंतु काही मुद्द्यावरून जनसंघाच्या नेत्यांनी जनता पक्ष सोडला आणि 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पक्ष ची स्थापना पंचनिष्ठांच्या आधारे केली.
आज या पक्षाचे आपल्याला वेगळे चित्र पाहायला मिळत आहे, कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या मदतीशिवाय मोठा होऊ शकत नाही. हा पक्ष कार्यकर्त्याच्या मदतीने मोठा झाला काही कार्यकर्त्यांनी स्वतःला पक्षश्रेष्ठी म्हणून मान्यता दिली व पक्ष हा सर्वात मोठा आहे पक्षाने दिलेली जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडायला पाहिजे अशी समजूत व्हायला लागली यातच आपल्याला कार्यकर्त्याला स्वतःची भूमिका बजावत असताना स्वतः झालेला अन्याय हा पक्षश्रेष्ठीला सांगण्याचा अधिकार नाही असे दिसून येते व जातीच्या राजकारणातून खऱ्या कार्यकर्त्याला दूर करण्यात येते.अकार्यक्षम उमेदवाराला तिकीट देण्यात येते.अशाच अन्यायाला समोरे गेलेले श्री सुधीरभाऊ रसे,एड.ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल,डॉ.राजेश उभाड व सोबतच हजारो कार्यकर्ते आजही पक्षाच्या अन्यायाला सहन करतील असे वाटत नाही.म्हणून इतिहासातील पाने पुन्हा इतिहासाची आठवण करून देत आहे,त्याचा परिणाम म्हणजे 'फौज ना हरी, कौम ना हरी, हार गई सरकार हमारी' अशी परिस्थिती या पक्षासमोर येऊ शकते.म्हणून मा.पक्षश्रेष्ठींनी पुनर्विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा असे असंख्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.