आयुष सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील यांची दक्षिण भारत जैन महासभेचे कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्ष श्री.भालचंद्र पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नेमणुकीचे पत्र त्यांना देण्यात आले. श्री.अमोल पाटील यांचे वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव संस्थेच्या पुढील वाटचालीत महत्वाचा ठरेल. दक्षिण भारत जैन सभा ही संस्कार शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर समाजासाठी कार्यरत आहे. तळागाळात विखुरलेल्या जैन समाजासाठी, त्यांच्या मदतीसाठी दक्षिण भारत सभेच्या सहयोगाने उत्तम कार्य करू असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सन्माननीय भालचंद्र पाटील साहेबांनी जी माझ्या जबाबदारी दिली आहे ती योग्यरित्या पेलण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन असे अमोल पाटील यांनी सांगितले.