आज 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी कार्यालय,सांगली (RIT) याठिकाणी स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहरजिल्हा उपाध्यक्ष मा.शीतल खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
जे योग्य आहे त्यासाठी उभे राहण्याची हिंमत आपल्या नेहमीच असू द्या ज्या वीरांनी हे शक्य केलं त्या वीरांचे स्मरण करून आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगत आहोत ते साजरे करूया. लोकशाही,एकता आणि देशाचा अभिमान यासारख्या भारतीय संविधानात अंतर्भूत केलेल्या आदर्शाचा हा दिवस साजरा करतो
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्ह्याचे सर्व आजी माजी नगरसेवक,सर्व फ्रंटल सेलचे प्रमुख पदाधिकारी,महिला पदाधिकारी-कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.