नांदेड :- राष्ट्रीय किसान दिवस मा.पंतप्रधान शेतकरी नेता चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राष्ट्रीय किसान दिन ब्रह्माकुमारीज सेवाकेंद्र वसंत नगर नांदेड येथे. 21 शेतकरी बांधवांचा,,शाल, सन्मानपत्र ,ट्रॉफी, देऊन साजरा करण्यात आला. व्यासपीठावर ब्रह्माकुमारीज संयुक्त प्रशासिका संतोष दिदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा सत्कार, सन्मानपत्र वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर ब्र.कु.मंजूदीदी सिकंदराबाद ब्र.कु. स्वाती बहिणजी संचा. वसंत नगर नांदेड. ब्रह्मकुमार प्रमोद भाई अबूपर्वत , बालाजी भाई, वृक्षमित्र संतोष मुगटकर, भानुदास पेंडकर सर ऍड. नांदेडकर ,यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आदरणीय संतोष दीदी यांनी शेतकरी या हा अन्नदाता नाही तर तो राष्ट्र निर्माता आहे. शहरी जीवनाचा पाया हा ग्रामीण शेतीवर अवलंबून आहे . सर्वांनी शेतकऱ्यांना जमेल तशी मदत करावी शेतकऱ्यांना मान सन्मान द्यावा , शेतकऱ्यांनी कमी खर्चाची विषमुक्त शाश्वत नैसर्गिक योगिक शेतीकडे वळावे ही काळाची गरज आहे. ब्रह्मकुमारीज कृषी ग्रामविकास प्रभाग द्वारे भारतभर शेतकऱ्यांना नैसर्गिक योगिक शेतीचे प्रशिक्षण दिले जाते यासाठी माउंट आबूला येण्याचे सर्वांना निमंत्रण दिले. यावेळी ब्रह्मकुमारी मंजू दीदी यांनी रासायनिक खताचे, औषधांचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत असून आज घराघरांमध्ये कॅन्सर सारखे दुर्गादार आजार वाढत आहेत.पर्यावरणाचे संवर्धन करणारी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी विषमुक्त शाश्वत योगिक शेती करावी व इतरांना पण नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रेरित करावे.ब्र.कु. स्वाती बहनजी म्हणाल्या आपण फॅमिली डॉक्टर निवडतो तसा फॅमिली शेतकरी निवडावा. जेणेकरून आपल्याला विषमुक्त नैसर्गिक अन्नास पुरवठा होईल आपले मन प्रसन्न आणि आरोग्य निरोगी राहील. शेतकरी सन्मार्तीमध्ये, सत्यनारायण मंत्रीभाई , कृषीभूषण भगवानभाई इंगोले, माधव कदम ,विश्वनाथ होळगे, बालाजी महाद्वाड, सतीश तळेगावकर , कृषीसखी अनिता अमोल सावंत, कृषीसखी आशा संजय खराटे, दिलीप निळेकर, संजय मामीडवार, व्यंकटेश कुलकर्णी, अभय केसराळीकर, राजेंद्र शंकर पुरे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्मकुमारी अनिता बहिण जी यांनी केले.